‘मला कॅबिनेट मंत्री करा’; रामदास आठवलेंची मागणी

Ramdas Athawale | येत्या काही दिवसांतच देशाच्या गादीवर नवं सरकार स्थापन होणार आहे. देशाच्या गादीवर पुन्हा एकदा नरेंद्र मोदी बसल्यानंतर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. या नव्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील किती आणि कोणते खासदार असणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. यातच, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाजपकडे एक मोठी मागणी केली आहे.
रामदास आठवले म्हणाले की, महाराष्ट्रात मी एकही जागा न मागता फुल्ल सपोर्ट केला. यावेळी मला कॅबिनेट मंत्री मिळाले पाहिजे. त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्रिपद मिळाले तर अतिशय चांगली गोष्ट आहे.
हेही वाचा – मनसेचा युटर्न? कोकण पदवीधर निवडणुकीतून मनसेची माघार
https://x.com/ANI/status/1798644573864067102
दरम्यान, एनडीएमध्ये भारतीय जनता पक्षाकडे सध्या २४० सीट आहेत. चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीकडे १६, नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे १२ तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे ७ जागा आहेत. शिवाय लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) कडे ५ जागा आहेत. त्यामुळे सत्तास्थापन केल्यानंतर कोणाला किती जागा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.





