Breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

#CoronoVirus:औरंगाबादमध्ये सकाळी आणखी 17 नवे कोरोना रुग्ण

औरंगाबाद : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. औरंगाबादमध्ये आज (7 मे) 17 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर काल (6 मे) दिवसभरात एकूण 35 कोरोना रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत 373 कोरोना रुग्ण आढळले .

दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासन चिंतेत आहे. तर प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात काल दिवसभरातच 35 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 26 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश सावंत यांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button