Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची पहिली यादी आज जाहीर होणार

पुणे | भाजपकडून काल (रविवारी २० ऑक्टोबर) विधानसभेसाठी उमेदवारांच्या नावाची पहिली यादी जाहीर झाली. या यादीमध्ये ९९ उमेदवारांचा समावेश आहे. भाजपच्या यादीनंतर आता विविध पक्षांकडून उमेदवारी यादी जाहीर केल्या जात आहेत. आज सकाळपासूनच राष्ट्रवादी अजित पवार गटात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अजित पवार गटाची पहिली उमेदवार यादी जाहीर होण्याचा मुहुर्त ठरला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाची पहिली यादी आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर होणार आहे. या यादीत विद्यमान आमदारांची नावे असण्याची शक्यता आहे. तसेच अजित पवार गटाची पहिली यादी ही फक्त ३२ ते ३५ उमेदवारांची असण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या यादीत कोणकोणत्या उमेदवारांनी संधी मिळणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हेही वाचा    –      ‘बापाबद्दल बोलाल तर याद राखा’; जयश्री थोरातांचा सुजय विखेंना दम

अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर होण्यापूर्वी उमेदवारी निश्चित झालेल्यांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. आज सकाळीच अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना बोलवण्यात आले होते. यात संजय बनोसेडे, राजेश विटेकर, चेतन तुपे, सुनील टिंगरे, दिलीप वळसे पाटील यांसह उमेदवारी निश्चित झालेले आमदार हे देवगिरी बंगल्यावर दाखल झाले. अजित पवारांच्या हस्ते यादी जाहीर करण्यापूर्वीच उमेदवारी निश्चित असलेल्या आमदारांना एबी फॅार्मचे वाटप करण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button