breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अंध विद्यार्थ्याला ‘पीएमपी’ वाहकाकडून मारहाण; चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल

चिंचवड – पुणे विद्यापीठावरून चिंचवडकडे प्रवास करत असणाऱ्या एका अंध विद्यार्थ्याला पीएमपीएनएलच्या वाहकाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी या अंध विद्यार्थ्याने चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

पांडुरंग रामचंद्र खरसळे हा विद्यार्थी पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठात शिक्षण घेत आहे. सकाळी सव्वादहा वाजता तो मित्राला भेटण्यासाठी चिंचवडकडे निघाला होता. हडपसर कडून चिंचवडकडे जाणाऱ्या बसने त्याने प्रवास सुरु केला. त्याच्याकडे असणारा बस पास होस्टेलवर राहिल्याने त्याने तिकिटासाठी वाचकाला दोन हजाराची नोट दिली. वाहकाने सुट्टे पैसे देण्याची मागणी केली. मात्र, सुट्टे पैसे नसल्याने मला उर्वरीत पैसे चिंचवडला बस गेल्यानंतर द्या, असे सांगितले. मात्र, संतप्त झालेल्या वाहकाने तुम्ही अंध व्यक्ती कायमच फुकट फिरत असल्याचे म्हणत अश्लील शब्दात शिवीगाळ केली. या बाबत पांडुरंग याने विचारपूस केली असता या वाहकाने त्याला मारहाण करत तोंडावर दोन चापट लागवल्या.

तुम्हाला तिकीट द्यायचे नसेल तर मी तपासणी करणाऱ्यांकडे दंड भरेल. मात्र तुम्ही मारहाण करू नका, असेही पांडुरंग याने सांगितले. मात्र, या वाहकाने उद्धट वर्तवणूक करत अपशब्द वापरले. झालेला प्रकार पांडुरंगने चिंचवडमधील त्याच्या दृष्टिहीन मित्रास सांगितला. बस चिंचवडला आल्यानंतर प्रशासनाच्या कार्यलयात मारहाण केल्याचा जाब विचारात तक्रार करण्यासाठी दोघेही गेले. मात्र, त्यांनाच इतर उपस्थित कर्मचारीही व्यवस्थित वागणूक देत नव्हते. या वेळी या दोघांनी मित्र परिवाराला घटनास्थळी बोलविले. वाहकाने माफी मागत काढता पाय घेतला. मात्र, पांडुरंगने या बाबत चिंचवड पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. चिंचवड पोलिसांनी या घटनेबाबत विचारपूस करत प्रमोद मालुसरे  (बॅच नंबर ४४४७) या वाहकावर मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक एस.ए.डिगे करीत आहेत.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button