breaking-newsताज्या घडामोडीपुणे

#CoronaVirus: पुण्यात 10 दिवसात 625 बेडचे जम्बो रुग्णालय उभं करणार, विभागीय अधिकाऱ्यांची माहिती

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात जम्बो रुग्णालय उभारण्याचे काम सुरु करण्यात आलेले आहे. 20 ऑगस्टपर्यंत दोन जम्बो रुग्णालय उभं करण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहे. पहिली जम्बो फॅसिलिटीज पिंपरी-चिंचवडमध्ये तयार केली जाईल. पुढील दहा दिवसात पिंपरी-चिंचवडला 625 बेडची जम्बो फॅसिलिटीज रुग्णालय उभारणार आहे, अशी माहिती विभागीय विशेष कार्य अधिकारी सौरभ राव यांनी दिलेली आहे. पिंपरी चिंचवडला 525 ऑक्सीजन बेड आणि 60 आयसीयू बेड उपलब्ध केले जाणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानंतर आता कामाला वेगाने सुरुवात झाली आहे, असंही सौरभ राव यांनी सांगितलेले आहे.

ससून रुग्णालयात सध्या 446 बेड रुग्णांसाठी वापरले जात आहे. पुढील तीन दिवसात ससूनला 870 बेड्स रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. या संदर्भात आवश्यक वैद्यकीय कर्मचारी, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरु आहे. राज्यात 1 ऑगस्टपासून अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू होत आहे. मात्र शहरातील सम-विषम दुकान संदर्भात सरकारच्या निर्देशानुसार निर्णय घेतलेला जाणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button