ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमराठवाडामहाराष्ट्रराजकारणराष्ट्रिय

चिंचवडमध्ये 50.47 % मतदान, शांततेत मतदान प्रक्रिया : आता निकालाकडे लागले लक्ष

पिंपरी: चुरशीच्या झालेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत 50.47 टक्के मतदान झाले. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. दुपारनंतर मतदानाच्या आकडेवारीत वाढ झाली. सन 2019 च्या निवडणुकीत 53.59 टक्के मतदान झाले होते. त्यातुलनेत पोटनिवडणुकीत 3 टक्के मतदान कमी झाले असून हा मतांचा टक्का कोणाला धक्का देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे ही पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून नाना काटे तर अपक्ष राहुल कलाटे यांच्यासह 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले आहे. सकाळी सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. पहिल्या दोन तासात 3.52 टक्के मतदानाची नोंद झाली. सकाळी 9 ते 11 या दरम्यान 10.45 टक्के मतदान झाले.

दुपारी 1 वाजेपर्यंत 20.68 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यानंतर 3 वाजेपर्यंत 30.35 टक्के मतदान झाले. तर, सायंकाळी 5 वाजेपर्यंत 41.06 टक्के मतदानाची नोंद झाली. शेवटच्या अर्ध्या तासात 10 टक्के मतदान झाले. दिवसभरात 50.47 टक्के मतदान झाले. 5 लाख 68 हजार 954 मतदारांपैकी 1 लाख 57 हजार 820 पुरुष तर 1 लाख 29 हजार 321 महिला, इतर 4 अशा 2 लाख 87 हजार 145 लोकांनी मतदान केले. 50.47 टक्के मतदान झाले आहे.दिव्यांग मतदारांसाठी व्हिल चेअरची व्यवस्था करण्यात आली होती. नव मतदारांमध्ये उत्साह होता. विविध मतदान केंद्रावर सकाळपासूनच नवमतदारांचा चांगला प्रतिसाद पहायला मिळाला. मतदान (ईव्हीएम) यंत्रे थेरगाव येथील स्व.शंकर आण्णा गावडे कामगार भवन येथे ठेवण्यात आली आहेत. दोन मार्च रोजी तेथेच मतमोजणी होणार आहे.

भाजपाचा विजय निश्चित : अश्विनी जगताप
मतदारांचा भाजपवर विश्वास असून विजय माझाच होणार असल्याचा विश्वास भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी मतदानानंतर व्यक्त केला. चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी चांगले मतदान झाले आहे. मतदारसंघातील मतदारांनी घराबाहेर पडून केलेल्या मतदानाबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी मतदारसंघात केलेल्या विकासाला मतदान करण्यासाठी मतदारांमध्ये पहिल्यापासून प्रचंड उत्साह होता. मतदान संपेपर्यंत हा उत्साह कायम राहिला. मतदारांनी मतदानातून दाखवलेला उत्साह भाजपला बळ देणारा आहे. ज्यादिवशी भाजपने मला उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला, त्याचदिवशी माझा विजय निश्चित झाला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्याचे काम करत आहेत. त्यामुळे सामान्य मतदारांचा भाजपवर विश्वास आहे की हाच पक्ष देशाला जगातील महासत्ता बनवू शकतो. चिंचवड मतदारसंघातील मतदार सुद्धा भाजपवर विश्वास व्यक्त करणारा आहे. येत्या 2 मार्च रोजी मतमोजणीतून मतदारांचा भाजपवरील विश्वास आणखी दृढ झालेला असेल. निवडणुकीत माझा विजय होणार याची मला खात्री आहे, असा विश्वास जगताप यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचा विजय होईल : नाना काटे
संपूर्ण मतदार संघात फिरत असताना, मतदारांच्या चेह-यावर दिसणार, हास्यच मला विजयाची खात्री देत होते. शेवटी एकीच बळ मिळणार फळ” हा वाक्यप्रचार महाआघाडीच्या विजयाने सत्यात उतरणार असल्याचा विश्वास महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी मतदान प्रक्रिया संपल्यानंतर व्यक्त केला.नाना काटे म्हणाले, माझ्या आयुष्यातील न विसरता येणारी ही निवडणूक झाली. माझी उमेदवारी जाहीर झाल्या पासून मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घेतली होती. प्रत्येक कार्यकर्ता हा ‘नाना काटे’ समजूनच काम करीत होता. शेवटी जनतेनेच निवडणूक हातात घेतली ही परीस्थिती निर्माण झाल्यानंतर पराभवाच्या भितीने पैशाचे लालच देणे, पोलीस यंत्रणेचा गैर वापर करणे, कार्यकर्त्यांना धमकावणे असे ही प्रकार झाले, मात्र त्याचा कुठेही परिणाम होवू न देता अगदी नेटान आणि त्वेषान कार्यकर्त लढले आणि म्हणून मी त्या प्रत्येक कार्यकर्त्यांचा, मतदारांचा, मनापासून ‘ऋणी आहे, हे उपकार मी कधीच विसरू शकत नाही, असेही ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button