TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

कसब्यात ५०.०६ तर चिंचवडमध्ये झाले ५०.४७ टक्के मतदान

पुणे : कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूकीसाठी आज मतदान प्रक्रिया पुर्ण झाली. आज सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया पार पडली. तसेच मतदानाची एकूण टक्केवारी किती होते, हे पाहणं महत्वाचे आहे.
कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. चिंचवडच्या मतदारसंघात एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार आहेत. पोटनिवडणुकीसाठी ५१० मतदार केंद्रावर मतदान पार पडले. सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५०. ४७ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
तर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील १३५ मतदान केंद्रावर मतदान पार पडले. सकाळी ७ वाजल्यापसून सायंकाळी ६ वाजेपर्यंत ५०. ०६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.
दरम्यान, २०१९ विधानसभेला चिंचवड मतदारसंघात ५६.३० टक्के मतदान झाले होते. तर कसबा मतदारसंघात ६१.५७ टक्के मतदान झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button