Uncategorizedराष्ट्रिय

काश्मीरमध्ये ‘सीआरपीएफ’च्या गाडीवर आंदोलनकर्त्यांचा हल्ला

श्रीनगर : श्रीनगरमध्ये सीआरपीएफच्या एका गाडीवर काही आंदोलनकर्त्यांनी निशाणा साधला आहे. हल्ला झाल्यानंतर घटनास्थळावरून निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या गाडीखाली तीन जण चिरडल्याची माहिती मिळते आहे. या घटनेनंतर श्रीनगरमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी मेहबुबा मुफ्ती सरकारवर कडाडून टीका केली आहे.

एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, गाडीखाली येऊन जखमी झालेल्या तीन जणांपैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. श्रीनगरमधील नोहटा भागातील ही घटना आहे. या घटनेचे फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याला ठरलेल्या ठिकाणी सोडल्यानंतर सीआरपीएफची गाडी परतत होती. ती गाडी आंदोलनकर्त्यांच्या गर्दीत सापडली. दरम्यान, ही घटना का व कशी घडली याबद्दल ठोस माहिती समोर आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button