breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशात ४१ हजार नवे बाधित, ३७ हजार रुग्णांना डिस्चार्ज

नवी दिल्ली – देशात गेल्या २४ तासांत ४१ हजार ६४९ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले असून ३७ हजार २९१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर ५९३ बाधितांच्या मृतांची नोंद झाली आहे.नव्या रुग्णसंख्येमुळे भारतात आजपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या नागरिकांचा आकडा ३ कोटी १६ लाख १३ हजार ९९३ इतका झाला आहे. मात्र, त्यापैकी आजघडीला फक्त ४ लाख ८ हजार ९२० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

दरम्यान, देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ५९३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा ४ लाख २३ हजार ८१० इतका झाला आहे. मात्र, देशपातळीवर गेल्या काही दिवसांमध्ये मृतांच्या आकड्यांमध्ये झालेली घट पाहाता हा काही प्रमाणात आरोग्य यंत्रणांसाठी दिलासा मानला जात आहे. तर, गेल्या २४ तासांत ३७ हजार २९१ बाधितांनी कोरोनावर मात केल्याने आतापर्यंत ३ कोटी ७ लाख ८१ हजार २६३ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button