breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

Olympic: भारताच्या आशा वाढल्या, डिस्क थ्रो स्पर्धेत कमलप्रीत कौरची अंतिम फेरीत धडक

टोकियो – मीराबाई चानू आणि पी.व्हि.सिंधुनंतर आता पुन्हा एकदा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या आशा वाढल्या आहेत. कारण डिस्क थ्रो स्पर्धेत कमलप्रीत कौरने अंतिम फेरीत धडक मारली असून तिने यात पदक मिळवले तर अॅथलेटिक्समध्ये पदक मिळ‌वणारी ती पहिली भारतीय बनू शकेल. कारण आतापर्यंत अॅथलेटिक्समध्ये भारतातील कोणालाही पदक मिळवता आलेलं नाही. पण कमलप्रीत कौरकडून पदकाच्या आशा वाढल्या आहेत. कमलप्रीत हिच्या नावावर नॅशनल रेकॉर्ड देखील जमा आहे.

पंजाबच्या श्री मुक्तसर साहिब जिल्ह्यातील बादल गावाची रहिवासी असलेली कमलप्रीत हिने पात्रता फेरीत भारताच्या दुसऱ्या प्रयत्नात 63.97 मीटर फेकली. पहिल्या प्रयत्नात तिची फेक 60.29 मीटर इतकी होती. पात्रता फेरीत ती दुसऱ्या स्थानी आहे. तिने ब गटातील पात्रता फेरीत ही चमकदार कामगिरी केली आहे. भारताच्या सीमा पुनिया गट अ पात्रता फेरीत सुरुवातीला सहाव्या स्थानावर होती. मात्र नंतर ती सोळाव्या स्थानी फेकली गेली ज्यामुळे तिला अंतिम फेरीत स्थान मिळवता आलं नाही.

आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पाचव्या स्थानावर

2019 मध्ये, दोहा येथे झालेल्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने पाचवे स्थान मिळवले होते. डिस्कस थ्रोमध्ये तिने 65 मीटर अडथळा पार केला आणि असे करणारी ती पहिली महिला ठरली. 2019 साली झालेल्या स्पर्धेत तिने 60.25 मीटर डिस्कस फेकून सुवर्णपदक पटकावले होते.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button