breaking-newsTOP Newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशमनोरंजनमहाराष्ट्र

‘Avatar 2’ सिनेमाची जगभरात 7000 कोटींहून अधिक कमाई

बॉक्स ऑफिसवरही 250 कोटींचा आकडा पार

‘अवतार द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाची सध्या जोरात चर्चा सुरू आहे. चित्रपटगृहांमध्ये अवतारचा भाग २ प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करत आहे. त्यामुळे ‘अवतार 2’चे कलेक्शन झपाट्याने वाढत आहे. ख्रिसमसच्या निमित्ताने ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने जगभरातच नव्हे तर भारतात देखील या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. आत्तापर्यंत ‘अवतार 2’ ने जगभरात 7000 कोटींहून अधिक कलेक्शन केले आहे.

हॉलिवूडचे प्रसिद्ध दिग्दर्शक जेम्स कैमरून यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केलं आहे.‘अवतार 2’ ने दुसऱ्या वीकेंडला जगभरात $850 दशलक्ष कमावले. ज्यामध्ये चित्रपटाने आंतरराष्ट्रीय स्तरावर $600 दशलक्ष आणि उत्तर अमेरिका बॉक्स ऑफिसवर $250 दशलक्षचा व्यवसाय केला आहे. अशाप्रकारे, भारतीय रुपयाच्या आधारे, ‘अवतार द वे वॉटर’ ने आतापर्यंत जगभरात 7000 कोटींहून अधिकची रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे, असं प्रसिद्ध व्यापार विश्लेषक रमेश बाला यांनी म्हटलं आहे.

रिलीजच्या 10 व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी ‘अवतार द वे ऑफ वॉटर’ने भारतीय बॉक्स ऑफिसवर 25 कोटींचा व्यवसाय केला. एका रिपोर्टनुसार, ‘अवतार 2’ ने दुसऱ्या वीकेंडला बॉक्स ऑफिसवर 59 कोटींहून अधिक कमाई केली. अशा परिस्थितीत आता हॉलिवूड दिग्दर्शक जेम्स कैमरून यांच्या या चित्रपटाच्या एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शनने 250 कोटींचा आकडा पार केला आहे.

लवकरच हा सिनेमा 300 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो. तसेच रिलीजच्या तिसऱ्या वीकेंडपर्यंत हा सिनेमा अनेक रेकॉर्ड मोडू शकतो. रिलीजआधीच या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या सिनेमाची निर्मिती 250 मिलियन डॉलर्स म्हणजेच 2000 कोटींमध्ये करण्यात आली आहे. भारतात हा सिनेमा हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित झाला आहे. जेम्स कॅमेरॉनने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button