breaking-newsआरोग्यताज्या घडामोडी

उन्हाळ्यात डिहायड्रेशन दूर करण्यासाठी प्या ही इलेक्ट्रोलाइटयुक्त पेये

Dehydration in Summer : सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. पुरेसे पाणी पिऊनही शरीराला पाण्याची कमतरता भासते; ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उदभवते. वाढलेल्या तापमानामुळे भरपूर घाम येतो आणि शरीरात द्रवपदार्थ प्रमाणापेक्षा कमी होतात. यालाच डिहायड्रेशन म्हणतात.सध्या उन्हाळा सुरू झाला आहे. पुरेसे पाणी पिऊनही शरीराला पाण्याची कमतरता भासते; ज्यामुळे डिहायड्रेशनची समस्या उदभवते.

वाढलेल्या तापमानामुळे भरपूर घाम येतो आणि शरीरात द्रवपदार्थ प्रमाणापेक्षा कमी होतात. यालाच डिहायड्रेशन म्हणतात. याविषयी द इंडियन एक्स्प्रेसने सेलिब्रेटी स्पोर्ट्स न्युट्रिशनिस्ट शोना प्रभू यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती दिली.शोना प्रभू सांगतात, “अशा वेळी आपल्या शरीराला ‘इलेक्ट्रोलाइट’ पेयांची आवश्यकता असते. खालील इलेक्ट्रोलाइट पेये आपल्या शरीरास हायड्रेटेड ठेवण्यास मदत करतात आणि त्यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही

हेही वाचा – काँग्रेसने म्हटलं देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा’; पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

नारळाचे पाणी

उन्हाळ्यात नारळाचे पाणी महत्त्वाची भूमिका बजावतात. हे पाणी आपल्या शरीराला पोटॅशियम, मॅग्नेशियम व सोडियम यांसारखे इलेक्ट्रोलाइट्स पुरवतात; ज्यामुळे शरीराला भरपूर पाणी मिळते. कोणत्याही साखरयुक्त पेयांपेक्षा नारळाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक साखर असते; जी आपल्याला त्वरित ऊर्जा देते.

लिंबू पाणी

लिंबू पाणी हे लोकप्रिय पेय आहे. उन्हाळ्यात अनेक जण लिंबाचा रस, पाणी आणि त्यात साखर व मीठ घालून घरगुती पेय बनवतात. हे पेय फक्त तहानच भागवत नाही, तर आपल्या शरीराला व्हिटॅमिन सी आणि इलेक्ट्रोलाइट्सही पुरवते; ज्यामुळे हायड्रेशनची समस्या उदभवत नाही.

ताक

ताक हे दही आणि पाण्यापासून बनविले जाते. त्यात साखर आणि जिरेपूड टाकली की, आणखी चविष्ट वाटते. हे पचनक्रियेसाठी आणि शरीराचे तापमान थंड करण्यासाठी फायदेशीर आहे. घामामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स कमी होतात; पण उन्हाळ्यात ताक प्यायल्यामुळे आपल्याला भरपूर इलेक्ट्रोलाइट्स मिळतात

जलजिरा

जलजिरा हे उन्हाळ्यातील एक लोकप्रिय पेय आहे. धणे, जिरे आणि इतर मसाले पाण्यात एकत्रित करून हे पेय बनविले जाते. हे शरीराचे तापमान कमी करते आणि पचनक्रियेशी संबंधित समस्या दूर करते. जलजिरा पेय हा शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे.

कडाक्याचे उन्हाच पाणी न पिता, खेळाडू खेळत असेल किंव फिटनेसप्रेमी वर्कआउट किंवा व्यायाम करीत असेल, तर डिहायड्रेशन होण्याची शक्यता जास्त असते. शोना प्रभू सांगतात, “वर्कआउट करण्यापूर्वी एक ते दोन ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. वर्कआउटदरम्यानसुद्धा एका ठरावीक वेळेनंतर इलेक्ट्रोलाइट पेय प्यावे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button