breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

25 गावांनी दिली प्रत्येक घरातून 2 भाकरीची दवंडी,रोज 5000 भाकरींचा डब्बा गरजूंपर्यंत

करोनामुळं करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अनेकजण शहरात अडकून पडले आहेत. यामुळे गरीब, निराधार, हातावर पोट असणाऱ्यांवरही उपासमारीची वेळ आली आहे. ही अडचण लक्षात घेऊन अनेकांनी पुढे येऊन मदतीचा हात दिला आहे..कोणी पैशांच्या स्वरूपात तर कोणी जेवण पुरवून…असंच काहीसं मदतीचं चित्र बीडमध्येही पहायला मिळालं…बीड तालुक्यातील पंचवीस गावांनी, दवंडी देऊन प्रत्येक घरातून दोन भाकरी जमा करीत दररोज तब्बल पाच हजार भाकरींचा डब्बा शहरात पाठवण्यास सुरु केल्याने मोठा दिलासा मिळाला.

बीड शहरासह सर्वत्र करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी २२ मार्चपासून लॉकडाउन, संचारबंदी करण्यात आली. जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्यानंतर सरकारने नागरिकांना आहे त्याच ठिकाणीच थांबण्याचा सल्ला दिला. अशा परिस्थितीत हातावर पोट असलेले, गरीब आणि निराधार नागरिक, बाहेरगावाहून शिकण्यासाठी, नोकरीसाठी शहरात खानावळींवर अवलंबून असलेल्या लोकांची जेवणाची अडचण निर्माण झाली. सर्व बंद असल्याने पैसे असूनही खायचे काय? असा प्रश्न उभा राहीला.

शहरातील नागरिकांची ही अडचण लक्षात घेत ‘जिओ जिंदगी’ ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण भागातील लोकांना याची कल्पना दिली. बीड तालुक्यातील अंथरवन पिंपरी, नांदूरसह पंधरा किमी परिसरातील २५ गावातील नागरिकांनी शहरात भाकरी बरोबर भाजी, चटणी, लोणचं असा डबा पाठवण्याचा निर्णय घेतला. गावात दवंडी देऊन प्रत्येक कुटुंबाने रोज दोन भाकरी जास्तीच्या करण्याचे आवाहन केले आणि दररोज तब्बल पाच हजार भाकरी जमा होण्यास सुरुवात झाली.

गावच्या मंदिरात, चावडीवर भाकरी जमा झाल्यानंतर ‘जिओ जिंदगी’ ग्रुपचे सदस्य हा डबा शहरात घेऊन जातात आणि शहरातील प्रशासन, सामाजिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून गरजवंतांना जेवणाचे डबे पुरवतात. लॉकडाउन संपेपर्यंत गरजवंतांना जेवण पाठवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button