breaking-newsराष्ट्रिय

…म्हणूनच अरविंद केजरीवाल यांच्या कानाखाली मारली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कानाखाली लगावणाऱ्या तरुणाने आपण नेमकं असं का केलं याचा खुलासा केला आहे. गेल्या आठवड्यात राजधानी दिल्लीत एका रोड शोदरम्यान त्याने अरविंद केजरीवाल यांच्या कानाखाली मारली होती. सुरेश याने आपण असं का केलं आपल्यालाच माहिती नसल्याचं सांगितलं आहे. आपल्या डोक्यात नेमकं काय सुरु होतं माहिती नाही, पण आता पश्चाताप होतं असं त्याने म्हटलं आहे.

‘त्यादिवशी माझ्या हातून असं का झालं काहीच कळत नाही आहे. जेव्हा मी जेलमध्ये होतो, तेव्हा मला प्रत्येक क्षणी आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होत होता’, असं सुरेश याने एएनआयशी बोलताना सांगितलं आहे. सुरेश याला पोलिसांनी रविवारी अटक केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश याने सांगितलं आहे की, आम आदमी नेत्यांच्या वागणुकीवर आपण नाराज होतो त्यामुळेच केजरीवाल यांच्या कानाखाली मारली.

दरम्यान सुरेश याने आपण कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसल्याचं सांगितलं आहे. ‘मी कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेलो नाही. कोणीही मला हे करण्यास सांगितलं नव्हतं. पोलिसांनी माझ्याशी कोणतंही असभ्य वर्तन केलं नाही. फक्त तुम्ही चुकीचं केलंत इतकंच सांगितलं’, असं सुरेश याने सांगितलं आहे.

अरविंद केजरीवाल प्रचारादरम्यान ओपन एसयुव्हीमधून जात असताना सुरेश याने बोनेटवर चढून कानाखाली मारली होती. यानंतर आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला पकडलं होतं. अरविंद केजरीवाल यांच्यावर अशा पद्धतीने हल्ला होण्याची ही पहिलीचे वेळ नाही.

२०१५ मध्ये दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एका व्यक्तीने केजरीवाल यांच्या कानाखाली मारली होती. त्याचवर्षी एका रिक्षाचालकाने रोड शोदरम्यान कानाखाली मारली होती. गतवर्षी नोव्हेंबर महिन्यात, एका व्यक्तीने उच्च न्यायालयाच्या आवारात अरविंद केजरीवाल यांच्या मिरची पावडर टाकली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button