breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

विद्या बालनच्या ‘नटखट’ला ऑस्करच्या शर्यतीत ऑफिशियल एन्ट्री

मुंबई – सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवल्या जाणाऱ्या ‘ऑस्कर पुरस्कार’ सोहळ्यात यंदा अभिनेत्री विद्या बालनच्या ‘नटखट’ या लघुपटाची वर्णी लागली आहे. आता या लघुपटाला ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री मिळाली असून सर्वश्रेष्ठ लघु चित्रपटा(लाईव्ह सेक्शन)साठी नटखट ऑस्करच्या शर्यतीत उतरला आहे.

नटखट या लघुपटाला लंडन आणि बर्मिघममध्ये लंडन इंडियन फिल्म फेस्टिव्हल (17-20 सप्टेंबर 2020), साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हल – ऑरलैंडो/फ्लोरिडा फिल्म फेस्टिव्हल (10-11 ऑक्टोबर 2020)साठी आमंत्रित करण्यात आले होते. तसेच मेलबर्नमधील इंडियन फिल्म फेस्टिव्हलची (16-23 ऑक्टोबर 2020) सुरुवात या लघुपटाने झाली होती. त्याचबरोबर बेस्ट ऑफ इंडिया शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्येही (7 नोव्हेंबर 2020) ‘नटखट’ला गौरविण्यात आले होते. त्यानंतर २०२१ सालच्या ऑस्करसाठी नामांकित करण्यात आले. आता नटखटची ऑस्करसाठी ऑफिशियल एन्ट्री झाली आहे.

‘नटखट’ हा 33 मिनिटांचा लघुपट आहे. त्याची निर्मिती रॉनी स्क्रूवाला आणि विद्या बालनने केली असून शान व्यास यांनी दिग्दर्शन केले आहे. या लघुपटाला जर्मन स्टार ऑफ इंडिया ऍवॉर्डनेदेखील सन्मानित करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button