breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मोबाईल शोरुम फोडणारी टोळी गजाआड, तिघांना अटक

नवी मुंबई: खारघरमधील शिव इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल शोरुमचे शटर गॅस कटरने कट करुन सुमारे 50 लाख रुपये किमतीच्या वस्तूंची चोरी करण्यात आलेली होती. या प्रकरणी नवी मुंबई गुन्हे शाखेने तीन आरोपींसह पोलिसांनी 45 लाख रुपयांचा चोरी केलेला ऐवज हस्तगत केलेला आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांनी आयुक्तालयात पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिलेली आहे. खारघर येथील शिव इलेक्ट्रॉनिक्स या मोबाईल शोरुमचे शटर गॅस कटरने कट करुन सुमारे 50 लाख किमतीच्या वस्तूंची चोरी करण्यात आलेली होती.

यामध्ये महागडे मोबाईल, लॅपटॉप, रोख रकमेचा समावेश होता. गुन्हेगारांनी अतिशय नियोजनरीत्या गुन्हा करत ओळख पटू नये यासाठी शोरुममधील डी.व्ही.आर काढून टाकला होता. त्यानंतर संबंधित मोबाईलचे शोरुम फोडून लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी करुन नेले. या गुन्ह्याचा समांतर तपास चालू असताना गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन. बी. कोल्हटकर यांना या गुन्ह्यातील आरोपींबाबत खात्रीशीर माहिती मिळाली.

त्यानुसार, मध्यवर्ती कक्षाचे अधिकारी आणि अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी धारावीतून शफिकउल्ला उर्फ सोनु अतिकउल्ला ( वय 24 वर्षे), अयान उर्फ निसार उर्फ बिटु रफी अहमद शेख (वय 28 वर्षे) आणि नालासोपारा येथून इम्रान मोहमद उर्फ इम्मु बिंदु अन्सारी (वय 25 वर्षे) या तिघांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांना सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button