breaking-newsपिंपरी / चिंचवड

23 जुलैपर्यंत काळेवाडी ते पिंपरी जोडणारा पूल राहणार बंद

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

काळेवाडी ते पिंपरी या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावरील सार्वजनिक वाहतूक २३ जुलैपर्यंत बंद केली आहे. वाहतूक पोलिस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी याबाबतचा आदेश निर्गमीत केला आहे. शहरात २३ जुलैपर्यंत लॉकडाऊन आहे. या पार्श्वभूमीवर काळेवाडी पिंपरी पुल वाहनांकरिता १८ जुलै ते २३ जुलै दरम्यान बंद राहणार आहे.

तळवडे विभागांतर्गत वाहतूक शाखेच्या वतीने वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. येथील देहूगाव मुख्य कमान ते आंबेडकर चौक या दरम्यान काही निर्बंध घालण्यात आले आहेत. या रस्त्यावर अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळता सम व विषम तारखेस पार्किंगचे तसेच आंबेडकर चौक ते मुख्यमंदिर व तालिम ते शिवाजी चौक येथील रस्त्यावर नो पार्किंग झोन अशा प्रकारचे निर्बंध घातले आहेत. वाहतूक शाखेच्या उपायुक्त कार्यालयाने याबाबतचा आदेश काढला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button