breaking-newsTOP Newsपिंपरी / चिंचवड

शहरात कोरोनाचे 10 हजारहून अधिक रुग्ण, केवळ 3 हजार 566 सक्रिय रुग्ण

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचा प्रदुर्भाव झफाट्याने वाढू लागला आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या कमी होण्याऐवजी वाढू लागली आहे. आज आतापर्यंतची रुग्णसंख्ये 10 हजार 85 झाली आहे.

मागील 15 ते 18 जुलै दरम्यान तब्बल दोन हजार नवीन रुग्णांची वाढ झाली. आज शनिवारी (दि. 18) दुपारी सव्वा एक वाजेपर्यंत 236 नवीन रुग्णांची भर पडली. पिंपरी-चिंचवडमध्ये जवळपास सर्वच भागात कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. दिवसाला 400, 500 जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह येत आहेत. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मंगळवारपासून दहा दिवसांसाठी लॉकडाउन लागू केला आहे. पण, लॉकडाउन कालावधीत रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढत चालली आहे.

शहरातील रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असली तरी, त्यात दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मोठे आहे. सक्रिय रुग्णांपेक्षा रुग्ण बरे होण्याची संख्या जास्त आहे. आजपर्यंत 6 हजार 350 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आजमितीला 3 हजार 566 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी तब्बल 2 हजार 323 रुग्णांमध्ये कोरोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. तर, 382 रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे असून 202 रुग्णांची प्रकृती गंभीर आहे. तर, आजपर्यंत शहरातील 171 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button