breaking-newsराष्ट्रिय

अयोध्येत 5 ऑगस्टला भूमिपूजन; पंतप्रधान सहभागी होण्याची शक्यता

सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्येत राममंदिर निर्माण कार्याला सुरुवात झाली आहे. पुढील महिन्यात 5 तारखेला मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती ‘आज तक’ने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट अध्यक्षाचे उत्तराधिकारी महंत कमळ नयन दास यांनी ट्रस्टचे अध्यक्ष नृत्य गोपाल दास यांनी पंतप्रधान मोदी यांनी भूमिपूजन कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण पाठवण्याची माहिती दिली. सध्या या कार्यक्रमात पंतप्रधान उपस्थित राहणार अथवा नाही याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र संत-महंत यांच्या निमंत्रणाचा मान राखत पंतप्रधान उपस्थित राहतील अशी शक्यता जास्त आहे.

महंत कमल दास यांनी याआधीच हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिन्यात मंदिराचे भूमिपूजन केले जाईल असे सांगितले होते. मंदिर कार्यासाठी मोठ-मोठ्या शिला कलाकृती करून तयार आहेत. मात्र प्रत्यक्ष निर्माण कार्य कधीपर्यंत सुरू होईल याबाबत त्यांनी माहिती दिलेली नाही. याबाबत निर्णय घेण्यासाठी शनिवारी अयोध्येतील सर्किट हाऊस येथे श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची महत्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत मंदिर निर्माण समितीचे चेअरमन नृपेंद्र मिश्रा सहभागी होणार आहेत.

नृपेंद्र मिश्रा 16 जुलैपासून अयोध्येत तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सुरक्षा सल्लागार के.के. शर्मा देखील आहेत. सोबत अभियंत्यांचे एक पथक देखील अयोध्येत असून मंदिर निर्माण करण्याची बारकाईने चाचपणी सुरू आहे. श्रीराम मंदिराचे मॉडेल तयार करणारे चंद्रकांत सोमपुरा आणि त्यांचे सुपुत्र निखिल सोमपुरा हे देखील अयोध्येत उपस्थित आहेत. शनिवारच्या बैठकीत भूमिपूजनाच्या तारखेवर मोहोर उमटवली जाईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button