breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

21 व 22 सप्टेंबरला मुंबई , ठाणे आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत येत्या 24 तासांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसतील अशी माहिती मिळत आहे. तसेच येत्या 21 व 22 सप्टेंबरला म्हणजेच सोमवार आणि मंगळवारी मुंबई , ठाणे आणि कोकणात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये असेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान IMD दिलेल्या माहितीनुसार, मुंबई, ठाण्यात मागील 24 तासांत हलक्या स्वरुपाचा पाऊस पडला. तर भाईंदर आणि मीरारोड परिसरात मुसळधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या भागात येत्या 24 तासांत अधूनमधून पावसाच्या सरी बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तर उद्या, परवामध्ये कोकण, गोवा भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button