breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘उर्मिला तू लेजंड आहेस’ अभिनेत्री पुजा भट्टने केली उर्मिलाची पाठराखण

दोन दिवसांपासून सुरु असलेला अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आणि कंगना रनौत यांच्यातला वाद मोठाच उफाळला आहे. कंगनाने माणूसकीची पातळी सोडत उर्मिलावर अत्यंत असभ्य आणि आक्षेपार्ह भाषेत टीका केली होती त्याबाबत अनेकांनी कंगनावर टिकेची झोड उठली होती. आता याबाबत पूजा भट्टने देखील उर्मिलाची बाजू घेतली आहे.

अभिनेत्री पूजा भट्ट या वादात कधीच पडली नव्हती. तरीही तिचं नाव कंगनाने घेतल्यानंतर नेपोटिझमवरून तिलाही खूप ट्रोल केलं गेलं. धमकावलं गेलं. म्हणून इन्स्टावरचं अकाऊंट पूजाने पर्सनलाईज्ड केलं. त्यानंतर पूजा गप्प होती. पण कंगनाने उर्मिलावर टीका केल्यानंतर मात्र तिने उर्मिलाची बाजू घेतली आहे. आपल्या ट्विटमध्ये पूजा म्हणते, ‘उर्मिला तू लेजंड आहेस. तू आपल्या रंगीलामधून आपल्या कामाची उंची दाखवून दिलीस. रंगीला ही डोळ्यांना आणि भावनांसाठी उत्तम मेजवानी होती. ती सगळ्याच गोष्टींना मोडत आपलं स्थान मिळवलंस. त्याकाळी हे सोपं नव्हतं. ती संवेदनशील आहेस आणि आपली प्रतिष्ठा राखून आहेस. याबद्दल मला आदर वाटतो. ‘

पूजा भट्टवरही कंगनाने बरीच टीका केली होती. सुशांतच्या मृत्यूला जी मंडळी जबाबदार असल्याचा आरोप कंगनाने केला होता त्यात महेश भट्ट यांचंही नाव होतं. रियाला सुशांतपासून तोंडण्यात महेश भट्ट यांचा हात असल्याचा आरोपही झाला. पुढे नेपोटिझमबाबतीतही त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं गेलं. त्यामुळे आलिया आणि पूजा यांनाही त्याचे परिणाम भोगावे लागले. असं असताना आता पूजाने उर्मिलाची बाजू घेतली आहे. या ट्विटमध्ये तिने कंगनाचा काहीच उल्लेख केलेला नाही. पण उर्मिलाला मात्र तिने लेजंड असं संबोधलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button