breaking-newsपुणेमहाराष्ट्र

स्मार्ट भागाची “अत्याधुनिक’ स्वच्छता

विद्यापीठ ते बाणेर दरम्यानच्या रस्त्यावर यांत्रिकीकरणाद्वारे सफाई

पुणे – पुणे स्मार्ट सिटी डेव्हल्पमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या वतीने विद्यापीठ ते बाणेर या दरम्यानच्या रस्त्यावरील अभिमानश्री सोसायटी नजीकचा बसथांबा येथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशा वाहनाद्वारे स्मार्ट यांत्रिकीकृत स्वच्छतेची चाचणी घेतली.

|यावेळी पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, महापालिकेचे वाहन विभागाचे कार्यकारी अभियंता किशोर पोळ, स्वच्छता उपनिरीक्षक भोईर तसेच चॅलेंजर स्वीपर्सचे मायरेक बायझिन्स्की, औंध-बाणेर-बालेवाडी भागातील नागरिक आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. जगताप म्हणाले, “रस्ते स्वच्छतेच्या क्षेत्रात अलीकडे अनेक सकारात्मक बदल झाले आहेत आणि या यांत्रिकीकृत स्वच्छतेच्या श्रेणीमध्ये अग्रेसर राहण्यासाठी पुणे स्मार्ट सिटी प्रयत्नशील आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील कंपन्यांच्या सहयोगाने प्रगत साधनांसह सर्वोत्कृष्ट कॅरेजवे स्वच्छतेचा प्रकल्प राबवून स्वच्छतेचा आंतरराष्ट्रीय बेंचमार्क गाठण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. या पथदर्शी प्रकल्पासाठीची चाचणी औंध-बाणेर-बालेवाडी भागांत पाच आठवडे घेण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

असा आहे प्रकल्प… 
रस्त्यावर सखोल स्वच्छता करून धूळ जास्तीत जास्त कमी करणे, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या कुंपनाच्या भिंती, दुभाजक, विजेचे खांब यांचीही स्वच्छता या यंत्राद्वारे करणे शक्‍य होते. तसेच रस्त्यावर वाहनांना अडथळा करणारी झुडुपे, फांद्या काढण्यासाठी खास साधनांचा यामध्ये समावेश आहे. हा प्रकल्प स्टील (STIHL) ही जर्मन कंपनी आणि चॅलेंजर ही उत्तर अमेरिकन कंपनी या दोन कंपन्यांच्या सहयोगाने राबविण्यात येणार आहे. या प्रक्रियेत सर्वोत्कृष्ट साधने आणि अग्रगण्य तंत्रज्ञान वापरले जाते. त्यामुळे रस्त्यावरील स्वीपरची ही सुविधा दीर्घकाळ टीकणारी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button