TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

शेतशिवारात पुन्हा हिरवळ फुलू दे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची श्री मयुरेश्वराच्या चरणी प्रार्थना

दुष्काळसदृश परिस्थिती दूर होऊन समाधानकारक पाऊस पडावा; बळीराजाच्या कष्टाला यश मिळावे, अशी मनोभावे प्रार्थना

मोरगाव : राज्यावर ओढवलेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचे संकट दूर व्हावे, शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा आणि त्यांच्या शेतशिवारात पुन्हा हिरवळ फुलावी, यासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री क्षेत्र मोरगाव येथे अष्टविनायकातील प्रथम गणपती श्री मयुरेश्वराच्या चरणी प्रार्थना केली.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी श्री मयुरेश्वराचे विधिवत पूजन करून मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी राज्यातील शेतकरी बांधवांच्या सुख-समृद्धीसाठी तसेच पाण्याचे संकट दूर होऊन महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस पडावा, अशी प्रार्थना केली.

हेही वाचा –  निवडणूक आयुक्तांच्या मुद्द्यावरून दिल्लीतील आंदोलन चिघळलं; संजय राऊतांचा मोदी सरकारवर निशाणा

बळीराजाच्या कष्टाला आणि घामाला यश मिळावे, शेतशिवारात पुन्हा पिकांची हिरवळ फुलावी आणि शेतकरी बांधवांच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती दूर होऊन शेतकऱ्यांना आवश्यक तो दिलासा मिळावा, त्यांच्या कष्टाला योग्य फळ मिळावे आणि महाराष्ट्रात सर्वत्र समृद्धी नांदावी, हीच श्री मयुरेश्वराच्या चरणी मनोभावे प्रार्थना असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button