Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराष्ट्रिय

२१ लाख फॉलोअर्स, पण मतं फक्त ३३! प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरचा सरपंच निवडणुकीत लाजिरवाणा पराभव

Omprakash Bishnoi | सोशल मीडियावरील लाखो फॉलोअर्स आणि आभासी जगातील प्रसिद्धी ही प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तवापेक्षा किती वेगळी असते, याचा प्रत्यय राजस्थानमधील एका निवडणुकीत आला आहे. तब्बल २१ लाखांहून अधिक सोशल मीडिया फॉलोअर्स असलेल्या ओमप्रकाश बिश्नोई या प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरने सरपंचपदाची निवडणूक लढवली खरी; मात्र गावातल्या मतदारांनी त्याला साफ नाकारले. १,६०० मतदारांपैकी बिश्नोई यांना केवळ ३३ मते मिळाली असून, या अनपेक्षित निकालाने सोशल मीडियावर मोठा फुगा फुटल्याची चर्चा रंगली आहे.

राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील ओसियां तालुक्यातील ‘इंदोन की धानी-२’ या गावात पार पडलेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत सोशल मीडियावरील प्रसिद्धीचा फुगा फुटल्याचे समोर आले आहे. स्वतःला ज्योतिषी, यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर म्हणवून घेणारे ओमप्रकाश बिश्नोई हे या निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

हेही वाचा

“मला २०२७ चा वर्ल्डकप खेळायचाय, म्हणून..”; रोहित शर्माचे मिश्किल वक्तव्य व्हायरल

बिश्नोई यांचे इन्स्टाग्रामवर १४ लाख, यूट्यूबवर ५ लाख आणि फेसबुकवर सुमारे अडीच लाख असे मिळून तब्बल २१ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी सोशल मीडियावर जोरदार प्रचारही केला, मात्र प्रत्यक्ष मतदानात गावातील १,६०० मतदारांपैकी केवळ ३३ जणांनीच त्यांच्या बाजूने कौल दिला. साधी पन्नास मतेही न मिळाल्याने मतदानाचा शेकडा गाठणेही त्यांना शक्य झाले नाही, ज्यामुळे बिश्नोई यांच्यासह त्यांच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे.

कार व्यावसायिकाने मारली बाजी

या सरपंचपदाच्या निवडणुकीत एकूण तीन उमेदवार रिंगणात होते. यामध्ये एका स्थानिक कार व्यावसायिकाने विजय मिळवला, तर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या एका शिक्षकाला ५२७ मते मिळाली. २१ लाखांचे आभासी ‘साम्राज्य’ असणारे ओमप्रकाश बिश्नोई मात्र अवघ्या ३३ मतांवर गारद झाले. सोशल मीडियावरील लाईक्स, कमेंट्स आणि आभासी प्रसिद्धीच्या जोरावर राजकीय यश मिळवता येत नाही, हेच या निकालाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button