Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

मनोरंजन क्षेत्रावर शोककळा! ‘सीआयडी’ मालिकेचे निर्माते-दिग्दर्शक बी. पी. सिंग यांचे निधन

B P Singh | भारतीय टेलिव्हिजनच्या इतिहासात दोन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘सीआयडी’ (CID) या गाजलेल्या मालिकेचे निर्माते आणि दिग्दर्शक ब्रिजेंद्रपाल सिंग ऊर्फ बी. पी. सिंग (वय ७७) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. बुधवारी (२८ ऑक्टोबर) त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने भारतीय मनोरंजन आणि टेलिव्हिजन जगताने एक दूरदृष्टी असलेला दिग्दर्शक गमावला असून सर्व स्तरांतून हळहळ व्यक्त केली जात आहे.

१९९८ ते २०१८ अशी सलग २० वर्षे चाललेल्या ‘सीआयडी’ या क्राईम थ्रिलर मालिकेचे ते सर्वेसर्वा होते. भारतीय टीव्ही जगतातील सर्वाधिक काळ चाललेल्या मालिकांमध्ये अग्रणी राहिलेल्या ‘सीआयडी’ची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्येही झाली आहे. केवळ पडद्यामागे दिग्दर्शक म्हणून काम न करता, त्यांनी या मालिकेत ‘डीसीपी शमशेर सिंग चित्रोले’ हे विक्षिप्त पण चतुर पोलीस अधिकाऱ्याचे पात्र साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. याशिवाय, नव्वदच्या दशकात प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणाऱ्या ‘आहट’ या थरारक मालिकेची निर्मितीही त्यांनीच केली होती.

हेही वाचा

दिवाळीत खासगी बसकडून जादा भाडे आकारल्यास कारवाई; पुणे आरटीओचा ट्रॅव्हल्सचालकांना इशारा

पुण्याच्या FTII मधून सुरुवात ते दूरदर्शनचा प्रवास

मूळचे डेहराडूनचे असलेले बी. पी. सिंग यांनी पुण्यातील नामांकित ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ (FTII) मधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दूरदर्शनमध्ये कॅमेरामन म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली. ‘सिर्फ चार दिन’ या चित्रपटाच्या पूर्वतयारीदरम्यान त्यांची पोलीस अधिकाऱ्यांशी वारंवार भेट झाली, आणि तिथूनच त्यांना गुन्हेविश्व आणि पोलीस तपासावर मालिका तयार करण्याची प्रेरणा मिळाली. पुढे त्यांनी दूरदर्शनसाठी ‘एक शून्य शून्य’ ही गाजलेली मालिका तयार केली.

बी. पी. सिंग यांनी ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’चे (IFTDA) अध्यक्ष म्हणूनही महत्त्वाचा कार्यभार सांभाळला होता.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button