TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लाडक्या बहिणींना जुलैचा हप्ता; १५०० रुपये थेट खात्यात जमा होणार

महिला लाभार्थ्यांसाठी महायुती सरकारची रक्षाबंधन भेट; आधार संलग्न बँक खात्यात डीबीटीद्वारे रक्कम जमा करण्याची प्रक्रिया

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. योजनेअंतर्गत जुलै महिन्याचा १५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे.

महिला सक्षमीकरण आणि आर्थिक स्वावलंबनाच्या उद्देशाने राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा आर्थिक सहाय्य दिले जाते.

हेही वाचा – मंत्रालयातील ‘एकाच खुर्ची’वर वर्षानुवर्षे बसलेले अधिकारी रडारवर; ३१४ जणांची यादी तयार

महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून लाभार्थ्यांची माहिती आणि बँक खात्यांची पडताळणी करून थेट लाभ हस्तांतरण (DBT) प्रणालीद्वारे रक्कम जमा केली जाते. त्यामुळे लाभार्थी महिलांनी आपले बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर हा हप्ता महिलांसाठी विशेष दिलासा ठरणार असून, राज्यातील लाखो लाभार्थी महिलांना याचा फायदा होणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि संबंधित यंत्रणांकडून हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button