ताज्या घडामोडीपुणे

जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा

पुणे | दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करून दुष्काळ जाहीर करण्यासाठी शास्त्रीय निकष व सुधारित कार्यपद्धती अवलंबन्यासाठी गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय दुष्काळ व्यवस्थापन समितीची बैठक अप्पर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, कृषी विभागाच्या रूपाली बंडगर, भूजल सर्वेक्षण विभागाचे जयंत मिसाळ तसेच वन विभाग, पशुसंवर्धन विभाग, पुरवठा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा

चिंचवडच्या प्रतिभा महाविद्यालयात २९ सप्टेंबर रोजी ‘प्रतिभा जॉब फेअर २०२६’

टंचाई आराखडा तयार करा, उपलब्ध पाणी साठ्याचे योग्य नियोजन करा, ज्या धान्याचे उत्पादन कमी झाले असेल त्याची साठेबाजी होणार नाही, यावर नियंत्रण ठेवावे, चारा पीक क्षेत्राचा अंदाज घ्या, पाण्याचा अनधिकृत उपसा होणार नाही याची काळजी घ्या,७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झालेल्या भागावर विशेष लक्ष द्या, अशा सूचना श्री. राऊत यांनी दिल्या.

बैठकीत तालुकानिहाय पर्जन्यमानाची ठळक वैशिष्ट्ये, तालुकानिहाय पावसाचा थंड कालावधी, खरीप हंगामातील पिकांची स्थिती, प्रधानमंत्री पिक विमा योजनेची तालुका निहाय अहवाल, फळ पिक विमा योजना मृगबहार तालुकानिहाय अहवाल, पीक कापणी वेळापत्रक, धरणातील पाणीसाठा,भूगर्भातील पाणी पातळी, चारा पीक क्षेत्र आदी बाबींचा आढावा घेण्यात आला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button