‘महिला हीच भारताची खरी ताकद’; राहुल गांधींची पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मनुस्मृतीवर टीका

पुणे | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा ‘छात्रों की गूंज’ हा विद्यार्थी संवाद कार्यक्रम पुण्यात मोठ्या उत्साहात पार पडला. या चौथ्या संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी राज्यभरातून आलेल्या विद्यार्थ्यांशी आणि विशेषतः ‘जेन झी’ (Gen Z) पिढीशी विविध सामाजिक व राष्ट्रीय मुद्द्यांवर थेट संवाद साधला. दिल्लीतील ‘जेन झी’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या सत्रात त्यांनी “देशातील ७० कोटी महिला हीच भारताची खरी ताकद आहे,” असे प्रतिपादन करत मनुस्मृतीतील विचारांवर तीव्र आक्षेप नोंदवला.
आपण येथे राजकारण करण्यासाठी आलो नसून तरुणांशी संवाद साधण्यासाठी आलो असल्याचे सांगत राहुल गांधी म्हणाले की, भारताच्या ताकदीविषयी विचारणा केल्यावर सैन्य, अर्थव्यवस्था किंवा लोकसंख्या अशी विविध उत्तरे समोर येतात; परंतु देशातील ७० कोटी महिला हीच भारताची खरी आणि सर्वात मोठी ताकद आहे. महिला स्वभावाने पुरुषांपेक्षा अधिक संवेदनशील, सौम्य आणि दयाळू असतात, ज्यामुळे त्या देशाचा भक्कम आधार आहेत.
हेही वाचा
नेस्ले, पेप्सिको, कोका-कोलासह १५० हून अधिक ब्रँड्सना FSSAI ची नोटीस
#WATCH | Pune, Maharashtra: Addressing the “Chhatron Ki Goonj” program, Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi says, “The Manusmriti says- “in childhood, a female belongs to her father. In youth, she belongs to her husband. When her lord is dead, she belongs to her sons. A… pic.twitter.com/JsqPlnFXsy
— ANI (@ANI) August 22, 2026
महिलांच्या चौकटी आणि स्वतंत्र अस्तित्वावर भाष्य
महिलांच्या सामाजिक अस्तित्वाविषयी बोलताना राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की, पुरुषांच्या दृष्टिकोनातून महिलांना अनेकदा मुलगी, पत्नी किंवा आई अशा तीन चौकटींमध्येच पाहिले जाते. आई किंवा मुलगी म्हणून ओळख असण्यात गैर काहीच नसले तरी ती त्यांची एकमेव ओळख असू शकत नाही. मनुस्मृतीने महिलांना या तीन चौकटीत बांधून ठेवले आणि महिला स्वतंत्र राहू नयेत असा विचार मांडला; मात्र महिलांनी स्वतःशिवाय अन्य कोणाच्याही दबावाला बांधिल राहू नये, असे विचार त्यांनी मांडले.





