TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

ओबीसींच्या मागण्यांवर सरकार सकारात्मक; चर्चेतून मार्ग काढत आहोत : मंत्री छगन भुजबळ

सरकारसोबत समन्वयातून ओबीसींच्या प्रश्नांवर मार्ग काढणार; जात जनगणनेच्या निर्णयाचे भुजबळांकडून स्वागत

नाशिक : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी सुरू असतानाच ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेची बैठक घेतली. गेल्या काही दिवसांपासून समता परिषदेची बैठक झालेली नव्हती. आज राज्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत विविध संघटनात्मक मुद्द्यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी भुजबळ यांनी ओबीसी आरक्षण, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनासह विविध मुद्द्यांवर भाष्य केले.

ओबीसी आरक्षण संपल्याबाबत सातत्याने होत असलेल्या वक्तव्यांवर छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली. ‘कोण म्हणते ओबीसीचे आरक्षण संपले? जात पडताळणीत काही चुका असतील तर त्यावर आम्ही लढतोय,’ असे त्यांनी स्पष्ट केले.

2011 पासून जात जनगणना करण्याची मागणी केली होती आणि आता सरकारने त्याबाबत निर्णय घेतला आहे. सरकार ओबीसींच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याने चर्चेतून मार्ग काढला जात असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

मनोज जरांगे पाटील यांच्या 29 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनाबाबतही भुजबळ यांनी भूमिका मांडली. ‘मनोज जरांगे यांची लढाई आमच्या विरोधात नाही. त्यावर आम्ही काय बोलणार? सरकार त्यावर बोलेल आणि निर्णय घेईल,’ असे त्यांनी म्हटले.

हेही वाचा –  ‘संबंध परस्पर हिताच्या कसोटीवर उतरले पाहिजेत’; बांगलादेश-पाकिस्तान-चीनबाबत जयशंकर यांची स्पष्ट भूमिका

ओबीसी समाजातील जातींची माहिती आणि विविध राज्यांमधील ओबीसींच्या नोंदींबाबत सरकारकडून काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

माळी समाजाचा उल्लेख करत भुजबळ म्हणाले की, गरज पडली तेव्हा मंत्रिपदाचा राजीनामा देऊन आपण राज्यभर फिरलो. ‘छगन भुजबळ हा काय घाबरला?’ असा सवाल करत ओबीसींच्या प्रश्नांवर आपण यापूर्वीही लढा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात एल निनोच्या प्रभावावर भाष्य

राज्यात एल निनोचा प्रभाव जाणवत असल्याचेही भुजबळ यांनी म्हटले. काही भागांत अतिवृष्टी होत आहे, तर काही ठिकाणी पावसाचा अभाव आहे. त्याचबरोबर पुन्हा उष्णता वाढली असून, हा ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

तुकाराम मुंढेंच्या कामाचे कौतुक

अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे भुजबळ यांनी कौतुक केले. अन्न ही श्रीमंत आणि गरीब अशा सर्वांसाठी आवश्यक बाब असून त्यासाठी स्वच्छता महत्त्वाची आहे, असे त्यांनी सांगितले. अंगणवाडीतील भोजनव्यवस्थेबाबतही तुकाराम मुंढे यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर अंगणवाडी समितीने मागणी केल्याचे भुजबळ यांनी नमूद केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button