Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल राजकीय मैदानात उतरणार? भाजप प्रवेशानंतरच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

नवी दिल्ली | भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल लवकरच निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना सायनाने अत्यंत सूचक भाष्य करत, आपण या पर्यायावर नक्कीच विचार करत असल्याचे स्पष्ट केले आहे.

सायना नेहवालने २०२० मध्ये भारतीय जनता पक्षात (भाजप) अधिकृत प्रवेश केला होता. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत तिने आपल्या राजकीय प्रवासावर आणि भूमिकेवर भाष्य केले. सायना म्हणाली, “मी अनेक वर्षे देशासाठी खेळले आणि विविध पदके जिंकली. सध्या मी भाजपसोबत असून, पक्षाच्या देशाच्या विकासातील योगदानामुळेच मी प्रवेश केला होता. देशाच्या हितासाठी केल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला माझा पूर्ण पाठिंबा आहे आणि मला देशासाठी आणखी खूप काही करायचे आहे.”

हेही वाचा

एसआयआरच्या पुढील टप्प्यासाठी प्रशासन सज्ज

निवडणूक लढवण्याच्या शक्यतेवर बोलताना ती पुढे म्हणाली की, “सध्या यावर कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही, परंतु मी निश्चितच त्या दिशेने विचार करत आहे.” तिच्या या वक्तव्यानंतर सायना नेहवाल प्रत्यक्ष राजकारणात सक्रीय होऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button