Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

“गळाभेट घेणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही”; राहुल गांधींनी केली पंतप्रधान मोदींची मिमिक्री

Rahul Gandhi | लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात बोलताना केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली. पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना त्यांनी थेट व्यासपीठावरच मोदींची मिमिक्री (नक्कल) करून दाखवली. “परदेश दौऱ्यांवर जाऊन जागतिक नेत्यांची गळाभेट घेणे म्हणजे परराष्ट्र धोरण नव्हे,” असा टोला लगावत त्यांनी एका नेत्याला आलिंगन देऊन मोदींच्या कार्यशैलीची खिल्ली उडवली. या घटनेचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर वेगाने व्हायरल होत आहे.

राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर हल्ला चढवत विचारले की, “पंतप्रधान मोदी आणि अमित शाह गेल्या २० दिवसांपासून सभागृहात का आले नाहीत? मोदी देशात पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे का जात नाहीत? सध्याचे सरकार सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष का करत आहे?” पुढे बोलताना ते म्हणाले की, “आता टाटा, गुडबायची वेळ आली आहे. जोपर्यंत पंतप्रधान मोदी राजीनामा देत नाहीत आणि अमित शाह पद सोडत नाहीत, तोपर्यंत विरोधक त्यांना शांत झोपू देणार नाहीत. आम्ही हा लढा देशाची मूल्ये आणि संस्कृती जपण्यासाठी कोणत्याही द्वेषाशिवाय लढत राहू.”

हेही वाचा

वाहतूक कोंडीमुक्त PMR साठी एकत्रित प्रयत्नांचा संकल्प

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, इराण आणि अमेरिका या दोन्ही देशांशी भारताचे चांगले संबंध होते. मात्र, या दोन्ही देशांमधील तणावादरम्यान भारताने मध्यस्थी करण्याची सुवर्णसंधी गमावली. या संघर्षात पाकिस्तानने पुढे येऊन मध्यस्थीची भूमिका बजावली, तर भारताला केवळ मूकदर्शकाची भूमिका घ्यावी लागली, असा आरोप करत त्यांनी परराष्ट्र धोरणाच्या अपयशावर बोट ठेवले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button