Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखली प्राधिकरणात कोयतेधारी अज्ञातांची दहशत

- पोलिसांनी तातडीने कारवाई करावी – संजीवन सांगळे

पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी: चिखली प्राधिकरण परिसरातील सेक्टर ११, १२ आणि १३ मधील विविध सोसायट्यांमध्ये मागील आठ दिवसांपासून चार ते पाच अज्ञात व्यक्ती हातात कोयते घेऊन फिरत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या व्यक्तींची हालचाल अनेक सोसायट्यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्येही कैद झाली असून, त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी पिंपरी-चिंचवडचे पोलीस अधीक्षक यांना निवेदन देत तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा – गुलवीर सिंगचा ऐतिहासिक पराक्रम.!

निवेदनात सांगितले आहे की, चिखली प्राधिकरणातील सेक्टर ११, १२ आणि १३ या भागात काही अज्ञात व्यक्ती दिवस-रात्र संशयास्पदरीत्या फिरत असून त्यांच्या हातात कोयते असल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, या भागात गेल्या दहा ते बारा दिवसांत चोरीच्या घटनाही घडल्या असल्याने नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

सोसायट्यांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये संबंधित संशयित स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा करण्यात आला असून, या फुटेजच्या आधारे पोलिसांनी तात्काळ तपास करून संबंधितांना ताब्यात घ्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच भविष्यात चोरी, लूट किंवा इतर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी या परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणीही करण्यात आली आहे.

या निवेदनाची प्रत चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली असून, नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्वरित आणि प्रभावी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

“चिखली प्राधिकरणातील सेक्टर ११, १२ आणि १३ या भागात काही अज्ञात व्यक्ती हातात कोयते घेऊन फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने या गंभीर प्रकाराची तातडीने दखल घेऊन संबंधितांना अटक करावी आणि चोरी किंवा इतर कोणत्याही गुन्हेगारी घटना घडू नयेत यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.”
– संजीवन सांगळे, अध्यक्ष, सोसायटी फेडरेशन

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button