‘पंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू’; संजय राऊतांचं टीकास्त्र

‘पंतप्रधान मोदी हे अंधभक्तांचे विश्वगुरू’; संजय राऊतांचं टीकास्त्र

हिंदूंचे आक्रोश मोर्चे कश्मिरी पंडितांच्या हत्येविरोधात का निघत नाही?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अंधभक्तातांचे विश्वगुरू आहेत, पण देशात सुरू असलेल्या आंतरिक सुरक्षेच्या मामल्यावर डोळे झाकता येणार नाहीत. काश्मीरात पंडितांच्या हत्या सुरूच आहेत आणि आता पंजाबात पुन्हा खलिस्तानी खदखद उफाळून येत आहेत. मात्र, अंधभक्तांचे विश्वगुरू त्यावर काहीच बोलत नाहीत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदराद्वारे केली आहे.

भारतीय जनता पक्ष अहंकार व उर्मटपणाच्या कळसावर पोहोचला आहे. त्या टोकावरून आता त्यांना देशाचे खरे प्रश्न दिसत नाहीत. अदाणी यांचा भ्रष्टाचार पाठीशी घालून त्यांना वाचविणारे सरकार कश्मिरी पंडितांना वाटवत नाहीत, हे नोंद करण्यासारखे आहे. महाराष्ट्रासह सर्वत्र भाजपापुरस्कृत सकल हिंदू आक्रोश मोर्चे लव्ह जिहादच्या विरोधात काढले जात आहे. असे सकल हिंदूंचे आक्रोश मोर्चे कश्मिरी पंडितांच्या हत्येविरोधात का निघत नाही?, असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थिती केली आहे.

या सकल मोर्चावाल्यांनी जम्मू-कश्मीरातील हिंदूंचे हाल काय ते समजून घेतले नाहीत. पुलवामाच्या बाजारात संजय शर्मांची हत्या त्यांच्या पत्नीसमोर झाली. तेथे हिंदू मोर्चा निघाला असता, तर बरे झाले असते, पण तेथे शेपट्या घालायच्या व महाराष्ट्रात हिंदू खतरे में म्हणून छाती पिटायची. हे राजकारण समाज बिघडवत आहे, अशी टिकाही राऊतांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *