Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

हाफकिन कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक चर्चा; महामंडळाच्या आधुनिकीकरणालाही गती

सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्याबाबत चर्चा; मुंबई महापालिकेसाठी आवश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव सादर करण्याचे उपसभापती सचिन अहिर यांचे निर्देश

मुंबई : हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांना ‘सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना’ लागू करण्यासह महामंडळाचे अद्ययावतीकरण आणि सक्षमीकरण करण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी दिली.

हाफकिन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर उपसभापती सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत विधान भवनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीला अन्न व औषध प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव संजय खंदारे, वित्त विभागाचे अवर सचिव क. ति. बडगुजर, हाफकिनचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक रमेश चव्हाण तसेच कर्मचारी शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा –  सायबर फसवणूक होताच ‘1930’ वर तातडीने संपर्क करा; मुख्यमंत्री फडणवीस यांचे नागरिकांना आवाहन

बैठकीत कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना तातडीने लागू करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका दर्शविल्याची माहिती देण्यात आली.

तसेच हाफकिन महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मागील अधिवेशनात मागणी करण्यात आलेल्या विशेष निधीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला.

हाफकिन महामंडळ अधिक सक्षम आणि स्वयंपूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेला आवश्यक असलेल्या औषधांची निर्मिती हाफकिनमध्ये करण्याचा प्रस्ताव तातडीने महापालिकेकडे सादर करावा, असे निर्देश उपसभापती सचिन अहिर यांनी प्रशासनाला दिले.

या निर्णयामुळे हाफकिन महामंडळाच्या उत्पादन क्षमतेत वाढ होण्यासोबतच संस्थेच्या आर्थिक सक्षमीकरणालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button