Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘भाजप आणि आरएसएसला आजही..’; प्रकाश आंबेडकरांची टीका

Prakash ambedkar | छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तविकपणे सुरत लुटलं नव्हतं. मात्र, सुरत लुटल्याचा खोटा इतिहास काँग्रेसने आपल्याला शिकवला, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्याच्या या वक्तव्यानंतर आता सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यावरून वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, र्तबगार व्यक्तिमत्त्वाचा इतिहास नाकारण्याचा प्रयत्न होतो आहे. त्याचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ब्राह्मणशाहीला आणि मनुस्मृतीला आव्हान उभे केले होते. त्यांनी अलुतेदार, बलुतेदार यांचे सैन्य उभे केले. त्याचं शल्य आजही भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाचा निषेध करतो. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. त्यांनी महाराजांची माफी मागायला हवी. पण ते माफी मागणार नाही, हे मला माहिती आहे.

हेही वाचा   –      पाऊस थैमान घालणार! IMD चा ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही ओबीसी समाजाच्या संघटनांबरोबर चर्चा केली आहे. जिल्हा पातळीवर समन्वय समिती आणि प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्रभरातील आदिवासी समाजाला एकत्र करण्याचं काम आम्ही करतो आहे. येत्या ९ किंवा १० तारखेला यासंदर्भात मुंबईत घोषणा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button