TOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कर्णकर्कश सायलेन्सरविरोधात आता दंडापुरते न थांबता कठोर कारवाई करा; नागपूर खंडपीठाचे निर्देश

ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी मोटार वाहन कायद्याचा प्रभावी वापर करण्याचे आदेश; ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस आयुक्तांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश

नागपूर : वाहनांमध्ये बसवण्यात येणाऱ्या कर्णकर्कश सायलेन्सरमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणावर केवळ दंडात्मक कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, असे स्पष्ट करत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पोलीस प्रशासनाला कठोर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. मोटार वाहन कायद्यातील तरतुदींचा प्रभावी वापर करून अशा वाहनांवर आणि चालकांवर ठोस कारवाई करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

नागपूर शहरात मागील तीन वर्षांत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून पोलिसांनी १० लाखांहून अधिक रुपयांचा दंड वसूल केला आहे. मात्र, दंड आकारूनही ध्वनिप्रदूषणाची समस्या कायम असल्याने न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

नागपूर पोलिसांच्या कारवाईनुसार २०२४ मध्ये ५६८ प्रकरणांमध्ये कारवाई करून ३ लाख ४६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. २०२५ मध्ये ६९३ प्रकरणांमध्ये कारवाई करत ५ लाख २८ हजार रुपयांचा दंड वसूल झाला. तर २०२६ मध्ये जुलैपर्यंत २५५ प्रकरणांमध्ये कारवाई करून १ लाख ५३ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हेही वाचा –  नेपाळमध्ये भीषण पुराचा तडाखा; तिबेटकडून आलेल्या पाण्याने रसुवा जिल्ह्यात हाहाकार

दंडाची कारवाई सुरू असूनही शहरातील परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर न्यायालयाने नागपूर पोलीस आयुक्तांकडून ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी कोणत्या ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत, याचा तपशील मागवला आहे. याबाबतचे प्रतिज्ञापत्र ७ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवरही न्यायालयाने महत्त्वाचे निर्देश दिले. उत्सवांसाठी प्रशासनाकडून ध्वनिवर्धक किंवा आवाजाची परवानगी मिळाली म्हणजे निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज करण्याची मुभा मिळत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

उत्सवांच्या काळातही ध्वनीमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालक आणि संबंधितांवर कोणतीही गय न करता कठोर कारवाई करावी, अशी भूमिका न्यायालयाने घेतली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Join WhatsApp Group