Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पाऊस थैमान घालणार! IMD चा ‘या’ जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

Maharashtra Weather | राज्यात पुढील काही दिवस पाऊस थैमान घालणार आहे. आज मराठवाडा, विदर्भातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

पुढील २४ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरांसाठी स्थानिक अंदाज आहे. शहर आणि उपनगरात मधूनमधून हलका ते मध्यम पाऊस/ मेघगर्जनेसह सामान्यतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३०°C आणि २७°C च्या आसपास असेल.

हेही वाचा    –       ‘भाजप-संघाचे कान धरून जातनिहाय जनगणना करून घेऊ’; लालूप्रसाद यादव यांची टीका 

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील धुळे, नंदुरबार, जळगाव, पुणे, सातारा, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

यलो अलर्ट दिलेल्या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button