Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीक्रिडाताज्या घडामोडी

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६: क्रिकेट सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी मैदानात उतरणार टीम इंडिया

Asian Games 2026 | २०व्या आशियाई क्रीडा स्पर्धांचे आयोजन यंदा जपानमध्ये करण्यात आले असून, जपानमधील आइची-नागोया येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेतील क्रिकेट सामन्यांचे संपूर्ण वेळापत्रक समोर आले आहे. काही क्रीडा प्रकारांची सुरुवात १० सप्टेंबरपासूनच होणार आहे. या स्पर्धेत भारताचे महिला आणि पुरुष क्रिकेट संघ पुन्हा एकदा पदकांचे प्रबळ दावेदार मानले जात असून त्यांचे सामने कधी आणि किती वाजता होणार आहेत, ते जाणून घेऊया…

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष आणि महिला क्रिकेट स्पर्धांकडे क्रीडाप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे. मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघांनी सुवर्णपदक जिंकले होते आणि यंदाही दोन्ही संघ जेतेपदाचे मुख्य दावेदार आहेत. पुरुष गटात भारतीय संघाचा पहिला सामना २८ सप्टेंबरला होणार असून महिला संघ आपला पहिला सामना १८ सप्टेंबरला खेळणार आहे. प्रत्येक दिवशी दोन सामने खेळवले जाणार असून पहिला सामना सकाळी ९ वाजता, तर दुसरा सामना दुपारी २ वाजता सुरू होईल.

पुरुष गटात सहभागी होणारे संघ:

गट अ: अफगाणिस्तान, जपान, नेपाळ

गट ब: हाँगकाँग-चीन, मलेशिया, ओमान

थेट प्रवेश मिळालेले संघ: भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका

पुरुष गटाचे संपूर्ण वेळापत्रक:

  • २४ सप्टेंबर २०२६ – अफगाणिस्तान विरूद्ध जपान
  • २४ सप्टेंबर २०२६ – हाँगकाँग-चीन विरूद्ध मलेशिया
  • २५ सप्टेंबर २०२६ – हाँगकाँग-चीन विरूद्ध ओमान
  • २५ सप्टेंबर २०२६ – अफगाणिस्तान विरूद्ध नेपाळ
  • २६ सप्टेंबर २०२६ – जपान विरूद्ध नेपाळ
  • २६ सप्टेंबर २०२६ – मलेशिया विरूद्ध ओमान
  • २८ सप्टेंबर २०२६ – पाकिस्तान विरूद्ध ब गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ
  • २८ सप्टेंबर २०२६ – भारत विरूद्ध अ गटातील दुसऱ्या स्थानावरील संघ
  • २९ सप्टेंबर २०२६ – श्रीलंका विरूद्ध अ गटातील विजेता संघ
  • २९ सप्टेंबर २०२६ – बांगलादेश विरूद्ध ब गटातील विजेता संघ
  • १ ऑक्टोबर २०२६ – क्वालिफायर-१ विजेता संघ विरूद्ध क्वालिफायर-४ विजेता संघ
  • १ ऑक्टोबर २०२६ – क्वालिफायर-२ विजेता संघ विरूद्ध क्वालिफायर-३ विजेता संघ
  • ३ ऑक्टोबर २०२६ – कांस्यपदकासाठीचा सामना
  • ३ ऑक्टोबर २०२६ – अंतिम सुवर्णपदक सामना

हेही वाचा

नेपाळमध्ये भीषण पूर; १०५ भारतीयांसह २९१ परदेशी नागरिक बेपत्ता

महिला गटात सहभागी होणारे संघ:

भारत, जपान, बांगलादेश, चीन, श्रीलंका, मलेशिया, पाकिस्तान, थायलंड.

महिला क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक:

  • १७ सप्टेंबर २०२६ – बांगलादेश विरूद्ध चीन
  • १७ सप्टेंबर २०२६ – पाकिस्तान विरूद्ध थायलंड
  • १८ सप्टेंबर २०२६ – श्रीलंका विरूद्ध मलेशिया
  • १८ सप्टेंबर २०२६ – भारत विरूद्ध जपान
  • २० सप्टेंबर २०२६ – नंबर-२ टीम विरूद्ध नंबर-३ टीमचे विजेते संघ
  • २० सप्टेंबर २०२६ – नंबर-१ टीम विरूद्ध नंबर-४ टीमचे विजेते संघ
  • २२ सप्टेंबर २०२६ – कांस्यपदकासाठीचा सामना
  • २२ सप्टेंबर २०२६ – अंतिम सुवर्णपदक सामना

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button