Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

राज्याचा पहिला ‘उद्योग रत्न’ पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर!

Share On

मुंबई : महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला जातो. याच धर्तीवर महाराष्ट्र शासन उद्योगरत्न पुरस्कार सुरू करणार असून याचा पहिला पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती ‘रतन टाटा’ यांना जाहीर झाल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत दिली.

उदय सामंत म्हणाले की, उद्योग क्षेत्रातील नामवंत व्यक्तींना उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या संदर्भात मुख्यमंत्रई एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, उद्योगमंत्री म्हणून आपला समावेश असलेल्या समितीची बैठकीत निर्णय घेण्यात आला. देशात मानाचा व प्रतिष्ठेचा ठरले असा हा पुरस्कार असेल. उद्योगरत्न पुरस्काराबरोबरच युवा उद्योजक, महिला उद्योजक आणि मराठी उद्योजकासाठी आणखी तीन पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी सांगितली.

हेही वाचा – निगडीतील मधुकर पवळे उड्डाण पूलाजवळ अपघातांची मालिका सुरूच; कठड्याला धडकून टँकरचा अपघात

रतन टाटा यांना याआधी ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले आहे, त्यांना देशातील दुसरा सर्वोच्च सन्मान ‘पद्मविभूषण’ देखील मिळालेला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button