TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्र

निगडीतील मधुकर पवळे उड्डाण पूलाजवळ अपघातांची मालिका सुरूच; कठड्याला धडकून टँकरचा अपघात

पिंपरी :
निगडी येथील कै.मधुकर पवळे उड्डाण पूलाजवळ कठड्याला टँकर धडकून अपघात झाला आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती मिळत आहे. निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाण पूल व मधुकर पवळे उड्डाण पूल याठिकाणी भुयारी मार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी टॅंकरचा अपघात झाला आहे. या अपघातामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली असून टँकरला बाजूला काढण्याचे काम सुरू आहे.

मधुकर पवळे उड्डाण पुल येथील भुयारी मार्गाचे काम संथ गतीने सुरू असून त्यामुळे येथे सातत्याने अपघात होत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त भुयारी मार्ग काम करत असलेल्या ठेकेदाराला मुदतवाढ देत आहेत. हा ठेकेदार महानगरपालिकेचा जावई आहे का? असा सवाल निगडी येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी उपस्थित केला आहे. या संधर्भात महापालिका आयुक्तांना वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात यावी जेणेकरून अपघात होणार नाही, अशीही मागणी काळभोर यांनी केली आहे.

या कामाच्या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आला नसल्याने वाहन चालकांना अंदाज येत नाही. अचानक वळण घेण्याच्या प्रयत्नात गाडी कठड्यावर आदळून अपघात होत आहेत. भुयारी मार्गाचे काम करत असलेल्या ठेकेदार खोसे पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाचा लाडका आहे का? यापूर्वी या ठिकाणी तीन जण अपघातात मरण पावले असून, त्या ठिकाणी खबरदारी घेतली जात नाही. वाहतूक सुरळीत होण्यासाठी ट्राफिक वॉर्डन सुरक्षा तैनात करण्यात येत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button