Breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया जास्त लांबलचक नसेल: पृथ्वीराज चव्हाण

Share On

नागपूर | महाईन्यूज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वातील महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार शेतकरी कर्जमाफीची घोषणा कधी करणार याकडे राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. तर शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची रोड मॅप सुद्धा सरकारने तयार केल्याचे बोलले जात आहे. मात्र महाविकास आघाडीच्या सरकारकडून देण्यात येणाऱ्या कर्जमाफीची प्रक्रिया लांबलचक नसल्याची माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले सरकार येताच शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीचे निर्णय घेतेले जातील असे आश्वासन दिले होते. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या सरकारकडून लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर सत्तेत असलेल्या पक्षातील नेत्यांकडून तसे संकेत सुद्धा देण्यात येत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button