Breaking-newsआरोग्य । लाईफस्टाईलताज्या घडामोडीराष्ट्रिय
#CoronaVirus: देशात ७५२९ बाधित, २४२ जणांचा बळी

देशभरात गेल्या २४ तासांत आणखी १०३५ जणांना करोनाची लागण झाली असून ४० जणांचा मृत्यू झाल्याने देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ७५२९ वर पोहोचली आहे तर मृतांची एकूण संख्या २४२ वर पोहोचली आहे.
देशातील ५८६ रुग्णालयांमध्ये करोना रुग्णांवर उपचार करण्यात येत असून तेथे एक लाखाहून अधिक विलगीकरण खाटा आणि अतिदक्षता विभागातील ११ हजार ५०० खाटा करोनाबाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत, असे आरोग्य मंत्रालयातर्फे शनिवारी सांगण्यात आले. सरकारने संचारबंदी आणि अन्य निर्बंध लादले नसते तर १५ एप्रिलपर्यंत देशातीलबाधितांची संख्या ८.२ लाखांहून अधिक झाली असती, असे आरोग्य मंत्रालयातील सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.





