ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

मा. महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्या यशस्वी पाठपुराव्याने उद्यमनगरातील रस्त्याच्या कामाला गती!

मनीष गार्डन ते रसरंग चौक मार्गाचा होणार कायापालट

– अर्बन स्ट्रीट पद्धतीने आधुनिक सुविधांची उभारणी

पिंपरी-चिंचवड । प्रतिनिधी

माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे उद्यमनगर परिसरातील मनीष गार्डन ते रसरंग चौक या महत्त्वाच्या रस्त्याच्या विकासकामाला पुन्हा गती मिळाली आहे. पावसाळ्यामुळे काही काळ थांबलेले काम पुन्हा सुरू झाले असून, अर्बन स्ट्रीट पद्धतीने या मार्गाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार आहे.

परिसरातील नागरिकांना सुरक्षित आणि सुविधायुक्त रस्ता उपलब्ध व्हावा, यासाठी डॉ. घोडेकर यांनी पाठपुरावा केला. काही महिन्यांपूर्वी या विकासकामाचा शुभारंभ झाला होता. मात्र, पावसाळ्यामुळे प्रत्यक्ष कामात खंड पडला. आता कामाला पुन्हा सुरुवात झाल्याने या मार्गाच्या कायापालटाचा मार्ग मोकळा झाला आहे.

हेही वाचा –  शिवसेना शिंदे गटात बंड; अमरावतीत महायुतीची डोकेदुखी वाढली

विकासकामांत सांडपाणी वाहिन्या, पावसाळी पाण्याचा निचरा करणारी व्यवस्था, सुंदर व सुरक्षित फूटपाथ, रस्त्याचे अद्ययावतीकरण आणि पथदिव्यांचा समावेश आहे. वाहतूक सुरळीत होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात येणार असून, नागरिक व ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय आणि ओपन जिमही उभारण्यात येणार आहे.

परिसराच्या भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ही कामे टप्प्याटप्प्याने करण्यात येणार आहेत. यामुळे पादचारी, वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांना अधिक सुरक्षित व सुकर प्रवासाची सुविधा मिळणार आहे. नागरिकांच्या दैनंदिन गरजांशी निगडित या कामाला पुन्हा सुरुवात होणे हे महत्त्वाचे पाऊल असून, आधुनिक सुविधांच्या माध्यमातून उद्यमनगरच्या विकासाला चालना मिळेल, असा विश्वास डॉ. वैशाली घोडेकर यांनी व्यक्त केला.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

“उद्यमनगरातील नागरिकांना सुरक्षित रस्ता आणि आधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. मनीष गार्डन ते रसरंग चौक या मार्गाचे काम पुन्हा सुरू झाले असून, फूटपाथ, पथदिवे, पाण्याचा निचरा आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची सोय अशा सुविधांमुळे परिसराचा कायापालट होणार आहे. हे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी माझा पाठपुरावा सुरू राहील.”

— डॉ. वैशाली घोडेकर, मा. महापौर, नगरसेविका.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button