ताज्या घडामोडीपुणे

कोथरूडमध्ये मध्यरात्री चोरांचा धुमाकूळ; एका फ्लॅटचे कुलूप तोडले

पुणे : कोथरूडमधील गणेश कॉलनी, बधाई परिसरातील गणंजय सोसायटी भागात आज पहाटे सुमारे ३:३० ते ४ वाजण्याच्या दरम्यान चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कृष्णकला बिल्डिंग परिसरातील श्री. धावडे यांच्या बिल्डिंगमध्ये चोरट्यांनी घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जवळच असलेल्या श्री. तोरडमल यांच्या चौकातील एका बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅटचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला.

हेही वाचा –  मा. महापौर डॉ. वैशाली घोडेकर यांच्या यशस्वी पाठपुराव्याने उद्यमनगरातील रस्त्याच्या कामाला गती!

सुदैवाने चोरट्यांच्या हाती कोणताही ऐवज लागला नसल्याची प्राथमिक माहिती आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी विशेष सतर्कता बाळगावी, दरवाजे व खिडक्या व्यवस्थित बंद ठेवाव्यात तसेच संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button