ताज्या घडामोडीमनोरंजन

‘दृश्यम ३: द कन्क्लुजन’साठी अजय देवगणला कोट्यवधींचे मानधन; तब्बू आणि श्रिया सरनची फी किती?

Drishyam 3 | बॉलिवूडचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सस्पेन्स-थ्रिलर सिनेमा ‘दृश्यम ३: द कन्क्लुजन’ २ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ॲडव्हान्स बुकिंगमध्येच या सिनेमाने कोट्यवधींची कमाई करत जोरदार सुरुवात केली आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात पुन्हा एकदा कलाकारांची तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार असून, या सिनेमासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाचे आकडे समोर आले आहेत.

‘न्यूज एक्स’च्या अहवालानुसार, ‘विजय साळगावकर’ ही मुख्य व्यक्तिरेखा साकारण्यासाठी अभिनेता अजय देवगणने तब्बल १८ ते २२ कोटी रुपये मानधन आकारले आहे. चित्रपटाच्या दोन्ही भागांप्रमाणेच या भागातही त्याच्या खांद्यावर सिनेमाची मोठी धुरा आहे. तर, माजी पोलीस महानिरीक्षक ‘मीरा देशमुख’ यांच्या दमदार भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री तब्बूला २.५ ते ३.५ कोटी रुपयांच्या दरम्यान मानधन देण्यात आल्याची माहिती आहे.

हेही वाचा

चाकण नगर परिषदेत स्वच्छता कर्मचाऱ्यांची क्षमता बांधणी कार्यशाळा

इतर प्रमुख कलाकारांना मिळालेल्या रक्कमेत विजयच्या पत्नीची, म्हणजेच ‘नंदिनी साळगावकर’ची भूमिका साकारणाऱ्या श्रिया सरनला या चित्रपटासाठी सुमारे १ कोटी रुपये मिळाले आहेत, तर विजय आणि नंदिनीची मोठी मुलगी ‘अंजू’च्या भूमिकेसाठी इशिता दत्ताला ५० लाख रुपये मानधन मिळाले आहे. याशिवाय मीरा देशमुख यांचे पती ‘महेश देशमुख’ यांची व्यक्तिरेखा साकारणारे ज्येष्ठ अभिनेते रजत कपूर यांना ४० ते ७० लाख रुपयांदरम्यान मानधन देण्यात आल्याचे समजते. कलाकारांच्या मानधनाचे हे आकडे विविध मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले असले, तरी निर्माते किंवा कलाकारांनी याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत पुष्टी केलेली नाही.

ॲडव्हान्स बुकिंगमध्ये कोट्यवधींचा गल्ला

‘दृश्यम’ आणि ‘दृश्यम २’ या दोन्ही सिनेमांच्या प्रचंड यशानंतर ‘दृश्यम ३: द कन्क्लुजन’बाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. २ ऑक्टोबर या साळगावकर कुटुंबाच्या ‘खास’ दिवशीच चित्रपटगृहांत प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच ॲडव्हान्स बुकिंगमधून कोट्यवधी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button