breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

2002 च्या गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लीन चिट

महाईन्यूज | दिल्ली

2002 साली झालेल्या गुजरात दंगली प्रकरणीचा नानावटी-मेहता आयोगाचा अंतिम अहवाल आज गुजरात विधानसभेत सादर करण्यात आलेला असून, या दंगली प्रकरणी तत्कालील मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर सदस्यांना क्लीन चिट देण्यात आलेली आहे. 2002 मध्ये कारसेवा आटोपून साबरमती एक्स्प्रेसमधून गुजरातमध्ये परतत असलेल्या कारसेवकांच्या डब्याला गोध्रा रेल्वे स्थानकाजवळ आग लावण्यात आलेली होती. या आगीत सुमारे 59 कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला होता.

त्यानंतर गुजरातमध्ये मोठी दंगल उसळली होती व या दंगलीत शेकडो नागरिक मृत्युमुखी पडले गेले होते. गुजरात दंगलीवरून देशात संतापाची तीव्र लाट पसरली होती. तसेच दंगल हाताळण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button