breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

शिवसेना राज्यसभेत नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाचं काय होणार?

वादग्रस्त नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत झाल्यानंतर आज राज्यसभेत सादर होत आहे.व त्यापूर्वी माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. “जे या विधेयकाला पाठिंबा देणार नाहीत, तो देशविरोधी आहे, ही काय नवीन व्याख्या तयार करू पाहतायत? आम्ही संसदेत आणि संसदेबाहेर आम्ही आमची मतं व्यक्त नाही करू शकत का? मग ईशान्य भारतात एवढे लोक रस्त्यावर उतरले आहेत, ते काय देशाच्या विरोधात होते?” असं राऊत म्हणाले आहेत.

त्यामुळे लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिल्यानंतर शिवसेना राज्यसभेतही या विधेयकावरून मित्रपक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात भूमिका घेणार की काय, हे बघणं नक्कीच महत्त्वाचं ठरनार आहे. राज्यसभेत शिवसेनेची भूमिका भाजपसाठीही अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

  • नागरिकत्व विधेयकामुळे चर्चेत आलेला नेहरू-लियाकत करार काय होता?
  • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लोकसभेत संमत झाल्यावर कोण काय म्हणालं?
  • नागरिकत्व दुरुस्ती विधेयक मुस्लिमविरोधी आहे?

लोकसभेत भाजपला बहुमत असल्यामुळे हे विधेयक संमत करण्यात भाजपला फार अडचण आलेली नाही. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला भाजपच्या 303 खासदारांसह एकूण 311 खासदारांनी समर्थन दिलेलं आहे. आज हे विधेयक राज्यसभेत मांडण्यात येईल व राज्यसभेत हे विधेयक मंजूर झालं तर विधेयकाचं रूपांतर कायद्यात होईल. भाजपनं 10 डिसेंबर आणि 11 डिसेंबरला आपल्या पक्षाच्या खासदारांसाठी व्हिप काढलेला आहे. पण राज्यसभेत हे विधेयक मंजूर करून घेणं भाजपसाठी तितकं सोपं असणार नाहीये .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button