breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

20 एप्रिलपासून फ्रिज, टीव्ही, कूलर, लॅपटॉप, मोबाइलची ऑनलाइन खरेदी करता येणार ?

नवी दिल्ली | कोरोनाचा संसर्ग नसलेल्या भागात २० एप्रिलपासून बाजारपेठा सुरू करण्याबाबत गुरुवारी गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. त्यानुसार सोमवारपासून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील सारख्या ई कॉमर्स कंपन्या मोबाइल तसेच फ्रिज, टीव्ही, लॅपटॉप, एसी, कुलर इत्यादी इलेक्ट्रॉनिक वस्तू, तयार कपडे आणि शाळकरी मुलांसाठी स्टेशनरी विकू शकतील.

स्थानिक बाजारपेठांत मात्र या वस्तूंची दुकाने उघडणार नाहीत. केेंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी बुधवारी ३ मे पर्यंत लॉकडाऊन कालावधीबाबत सुधारीत निर्देश जाहीर केल्याच्या दुसऱ्या दिवशी हा निर्णय झाला. या निर्देशांमध्ये ई-कॉमर्स कंपन्या आणि कुरिअर कंपन्यांना २० एप्रिलपासून काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आली होती. ताज्या खुलाशात म्हटले आहे की, ई कॉमर्स कंपन्यांची वाहने संबंधित प्राधिकरणाच्या परवानगी नंतरच ये- जा करू शकतील. ही सूट केवळ कोरोनाचा हॉटस्पॉट नसलेल्या भागातच देण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button