breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला एकनाथ शिंदेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘रावणालाच खूप चेहरे असतात’

मुंबई : इंडिया आघाडीत पंतप्रधान पदासाठी अनेक पर्याय आहेत. परंतु भाजपाकडे काय पर्याय आहे? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. रावणालाच खूप चेहरे असतात, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहमदनगरच्या राहता तालुक्यात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला. ते म्हणाले, आज मुंबईत सगळे विरोधी पक्ष एकत्र आले आहेत. कशाला आलेत? तर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी कसं लढावं यावर चर्चा करायला एकत्र आले आहेत. मी त्यांना सांगेन, आग से मत खेलो, नहीं तो आपके हात जल जाएंगे (आगीशी खेळू नका, अन्यथा तुमचे हात भाजतील).

हेही वाचा – उद्योगनगरी पिंपरी-चिंचवड ही ‘क्रीडानगरी’ होईल ; शंकर जगताप यांचा विश्वास

काल-परवा कोणीतरी सांगितलं पंतप्रधानपदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, भाजपाकडे दुसरा चेहरा कोण आहे हे त्यांनी सांगावं. खरंतर, अनेक चेहरे कोणाला असतात हे तुम्हाला माहिती आहे. अनेक चेहरे हे रावणाला असतात. तिकडे रावण आहेत आणि इकडे आपण सगळे जय श्री रामवाले रामभक्त आहोत, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button