breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

कारच्या जुन्या पार्टपासून सुमारे 22,000 रुपयांत बनवला व्हेंटिलेटर

काबूल | काेराेनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी सर्वात आवश्यक साधन म्हणजे व्हेंटिलेटर. अनेक देश व्हेंटिलेटरच्या तुटवड्याच्या समस्येला ताेंड देत आहेत. अफगाणिस्तानातही ही समस्या आहे. ३.५ काेटी लाेकसंख्येच्या या देशात केवळ ३०० व्हेंटिलेटर आहेत. देशात सुमारे ८४० बाधित आहेत, तर ३० जणांचा काेराेनामुळे मृत्यू झाला. ही समस्या दूर करण्यासाठी हेरातच्या गर्ल्स राेबाेटिक टीमने कारच्या जुन्या सुट्या भागांपासून व्हेंटिलेटर तयार केले आहे. ते केवळ २२ हजार रुपयांत. बाजारात स्वस्तामधील व्हेंटिलेटरची किंमत सुमारे २० ते २३ लाख रुपये आहे.

मुलींची ही टीम हार्वर्ड विद्यापीठ व स्थानिक आराेग्यतज्ञांसाेबत या प्रकल्पावर काम करत आहे. अफगाणिस्तानमध्ये टेक कंपनी संचालक व प्रकल्पाला सहकार्य करणाऱ्या राेया महबूब म्हणाल्या, मॅसाच्युसेट्स इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजीने दिलेल्या डिझाइनवर आधारित प्राेटाेटाइप तयार केला आहे. टीममध्ये पाच मुली आहेत. त्यांचे वय १४ ते १७ वर्षे आहे. त्या सर्व मूळच्या हेरातच्या आहेत. या भागात इराणमधून परतलेल्यांमुळे काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याची समस्या आहे.

व्हेंटिलेटरच्या समस्येबद्दल हेरात प्रांताच्या राज्यपालांनी कल्पना दिली तेव्हा या मुलींनी जुन्या टाेयाेटा कारची बॅटरी व सुटे भाग यांच्या साहाय्याने व्हेंटिलेटर प्रत्यक्ष साकारले. अफगाणिस्तानच्या आराेग्य मंत्रालयाचे प्रवक्ते वाहिदुल्ला मयार म्हणाले, तज्ञ व अभियंत्यांना टीमला मदत करण्याची सूचना दिली. डिव्हाइसला जागतिक आराेग्य संघटनेच्या परवानगीसाठी पाठवण्यात आले आहे. अफगाण ड्रीमर्स म्हणून आेळख असलेली ही टीम २०१७ मध्येदेखील चर्चेत आली हाेती. तेव्हा अमेरिकेत राेबाेटिक स्पर्धेतही या टीमने सहभागी हाेण्याची इच्छा दर्शवली हाेती. ट्रम्प यांच्या हस्तक्षेपानंतर प्रवेशाची परवानगी मिळाली हाेती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button